रक्कम बचतीचे नियोजन


 

          आर्थिक नियोजन

          मित्रांनो आपण शैक्षणिक साक्षर होतो परंतु आर्थिक साक्षर होत नाही. गणिताची आकडेमोड येणे म्हणजे आर्थिक साक्षरता नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे बचतीची सवय. पालकांनी आर्थिक साक्षर होऊन आपल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनी मधून बचतीची सवय लावणे हि आर्थिक नियोजनाची पहिली पायरी. उधळपट्टी आणि आर्थिक नियोजन यांचा छत्तीस चा आकडा आहे. विद्यार्थी दशेतच  जर आर्थिक नियोजनाचे धडे मिळाले तर  आपल्याला संपूर्ण आयुष्य सुख आणि समाधानाने जगता येईल.बचती बरोबर पहिली कमाई सुयोग्य रित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्वीतां सुरु होते.आर्थिक नियोजनाचे महत्व आपणांस जर आता समजले असेल तर  आपले वय कितीही असुदे या क्षणा पासून सुरुवात करा.  


           बचतीचे गणित समजून घ्या


          कमाई आहे पण बचत होत नाही. महिन्याकाठी पैसे शिल्लकच राहत नाहीत. अधिकाधिक नोकरी करणाऱ्यांची हीच समस्या असते. मग स्वत:ला दिलासा देण्यासाठी म्हणतात, जेव्हा पगार  वाढेल तेव्हा काही पैसे बचत करू. पण असे कधीच होत नाही. जेणेकरून भविष्यात तुम्हाला पैसे कामाला येतील. तुमचीही बचत होत नाही. तुम्हालाही ही समस्या जाणवतेय का?

जे म्हणतात, पगार वाढल्यावर बचतीचा विचार करू. ते कधीही पैसे वाचवू शकत नाहीत,  कारण पगार वाढण्याची अपेक्षा कधी संपत नाही. जर तुम्हाला आहे त्या पगारात बचत करायची असेल तर त्यासाठी इच्छाशक्ती आणि उत्तम नियोजनाची गरज आहे. चला, आज मी  तुम्हाला बचत कशी आणि किती करायची याबाबत काही टिप्स देत आहे. 


२० हजार पगार असणारेही बचत करू शकतात


जर तुमचा पगार २० हजार  रुपये महिना असेल तर त्यातही बचत होऊ शकते. फॉर्म्युला असा की पगार झाल्यानंतर सर्वात आधी बचतीचा काही भाग दुसऱ्या खात्यात वर्ग करा. जर दुसरे खाते नसेल तर बचतीसाठी जे पैसे ठरवलेत ते खर्च होणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर महिन्याला पगाराच्या १० टक्के भाग शिल्लक ठेवा. म्हणजे सुरुवातीला ६ महिन्यापर्यंत केवळ २ हजार रुपयांची बचत करा.


          जर तुमचा पगार ५० हजार असेल तर


          आजच्या काळात अनेकांना ५० हजारांपर्यंत पगार मिळतो. जर तुम्हालाही महिन्याला ५० हजाराच्या आसपास पगार असेल तर आम्ही तुम्हाला गणित सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिन्याला कसे आणि किती बचत करू शकाल, त्याची गुंतवणूक कुठे करायची जेणेकरून भविष्यात तुम्हाला मोठी रक्कम हाती लागेल आणि संकटात कामाला येईल.  जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला दोन मुले असतील. तरीही तुम्ही तुमच्या ५०००० पगारातून बचत करू शकता. सर्वसाधारणपणे, पगारदार लोकांनी, विशेषत: खासगी नोकरी करणाऱ्यांनी दरमहा त्यांच्या पगारातील सुमारे ३० टक्के बचत केली पाहिजे. म्हणजेच दरमहा १५ हजार रुपये वाचवले पाहिजेत, असा नियम आहे. जर तुमचा पगार ५० हजार असेल आणि तुम्ही त्यात दर महिन्याला १५ हजार रुपये वाचवत नसाल, तर तुम्ही गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठू शकणार नाही, याचा तुम्ही लगेच विचार करायला हवा.


          १० टक्के बचतीपासून सुरुवात करा


१० टक्के बचतीपासून सुरुवात करा. जर तुम्ही बचत करायला सुरुवात करत असाल, तर १०% ने सुरुवात करा, परंतु तुम्ही ३०% बचत होईपर्यंत ते दर ६ महिन्यांनी ते प्रमाण वाढवत रहा. सुरुवातीला तुम्हाला खूप समस्यांना सामोरे जावे लागेल, खर्च भागणार नाही,  कारण संपूर्ण पगार खर्च करण्याची सवय आधीच लागली आहे. पण ६ महिन्यात तुम्ही तुमची सवय बदलू शकता. प्रथम खर्चाची यादी तयार करा. त्यामध्ये जे आवश्यक आहे त्यांना प्राधान्य द्या. नंतर जे वाचवणं शक्य आहे याचा विचार करा. जर महिन्यातून ४ वेळा बाहेर जेवायला जायची  सवय असेल तर महिन्यातून २ वेळा करा. याशिवाय अनावश्यक खर्चांची यादी बनवा, जे तुम्ही दर महिन्याला अनावश्यकपणे खर्च करता, प्रत्येक व्यक्ती आपल्या पगारातील १०% अनावश्यक खर्च करतो. अशाप्रकारे ५० हजार रुपये पगार असलेले लोक वार्षिक १.८० लाख रुपये वाचवू शकतात. तुम्ही दर महिन्याला १५ हजार रुपये वाचवता तेव्हा त्यातील ५ हजार रुपये इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. तुम्ही  दर महिन्याला ५ हजार रुपये SIP करू शकता. ज्यामध्ये तुम्ही स्मॉल कॅप फंड,  मिडकॅप फंड,  लार्ज कॅप फंड  यासारख्या फंडामध्ये तुम्ही रक्कम गुंतवू शकता. याशिवाय उरलेले ५  हजार रुपये विना जोखमी च्या गोल्ड बाँडमध्ये गुंतवता येतील. जेव्हा जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवत राहा. जर तुम्ही १० वर्षे या फॉर्म्युल्यासह बचत आणि गुंतवणूक करत राहिल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. अडचणीच्या काळातही या रक्कमेची मोठी मदत होईल. 


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.