Posts

Showing posts with the label Latest News

ब्रेकिंग ! बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Image
  ब्रेकिंग !  बुधवारी सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर    

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.

Image
पुणे येथे  ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६  पदांना मान्यता. आपल्या माहितीस्तव शासन  निर्णय :-

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागणीबाबत बैठकीचे इतिवृत्त

Image
 महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२/०६/२०२३ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त 

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतरच होणार.

Image
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरनंतरच होणार.  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय  सहकार मंत्री अतुल सावें यांनी घेतला आहे. महाराष्ट्र  राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहे.  सध्या राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण  होवून शकते. तसेच,  राज्यातील शेतकरी वर्ग ही पावसाळा असल्याने पेरणीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  वरील सर्व कारणांमुळे  सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा  मोठा निर्णय घेतला आहे .  पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२३ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असे सरकारचे म्हणणे आहे. काढण्यात  आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

  आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)  मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.  आज मंत्रिमंडळ कडून घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे : 1)  वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव. 2) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव. 3)  राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता. 4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ. 5) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. 6)  संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ. 7)  आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार. 8)  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा

आनंदाची बातमी! मान्सून आला

Image
आनंदाची बातमी! मान्सून आला  राज्यात २४ जून पासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. २४ जून ते ३ जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं हवामान विभागाने सांगितलं आहे. या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले ओसांडून वाहतील हवामान विभागाचा अंदाज आहे         पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच व जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यावरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर

Image
  GCC संगणक परिक्षेचा निकाल जाहीर. पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx

हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha)

Image
  हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti Muhurtha) Hanuman Jayanti 2023 : यंदाची हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि या दिनाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा http://dhunt.in/KUOLt

संपकरी कर्मचारी यांचा पगार नव्हे नियमित रजा कापणार

Image
  संपकरी कर्मचारी यांचा  पगार नव्हे नियमित रजा  कापणार संघटनांशी  चर्चेनंतर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  आश्वासन संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित झाली नसली तरी संप काळातील सहा दिवसांचा पगार कापला जाण्याची  टांगती तलवार  कर्मचाऱ्यांवर होती.  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचा पगार न कापण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.      त्यामुळे संप  कालावधीतील गैरहजेरी  अनियमित रजा धरण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या नियमित रजा  कापल्या जाणार आहेत.  याविषयीचा सुधारित शासन निर्णयही  जाहीर केला जाणार आहे.  त्यामुळे संपकरी  कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिष्टाई ठरली यशस्वी अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असतानाच जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यभरातील 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 ते 20 मार्च दरम्यान संप पुकारला होता. मात्र सरकारने मागील आठवड्यात काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या काळातील  गैरहजेरी  अनियमित रजा धरल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार होता. याबाबत कर्मचारी संघटनांनी मुख्यम

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युटी निर्णय

Image
 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन चे नियम लागु । सेवानिवृत्तिनंतर मिळणार उपदान !

अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३

Image
अंदाजीत आषाढी वारी वेळापत्रक २०२३    #ipl #csk vs Gt #April 1 ११/०६/२०२३ - माऊली प्रस्थान आळंदी १२/०६/२०२३  - आळंदी ते पुणे, २९ कि.मी. १३/०६/२०२३ -  पुणे मुक्काम १४/०६/२०२३ -  पुणे ते सासवड, ३२ कि.मी. १५/०६/२०२३ -  सासवड मुक्काम १६/०६/२०२३ -  सासवड ते जेजुरी,१६ कि.मी. १७/०६/२०२३  - जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी. १८/०६/२०२३ - वाल्हे ते लोणंद,२० कि.मी. १९/०६/२०२३ -  लोणंद मुक्काम २०/०६/२०२३ -  लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी. २१/०६/२०२३ -  तरडगाव ते फलटण २१ कि.मी. २२/०६/२०२३ - फलटण ते बरड, १८ कि.मी. २३/०६/२०२३ - बरड ते नातेपुते, २१कि.मी. २४/०६/२०२३ -  नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी. २५/०६/२०२३ -  माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी. २६/०६/२०२३ -  वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी. २७/०६/२०२३ -  भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी २८/०६/२०२३  - वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी. २९/०६/२०२३ -  देवषयनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या पुढे, ३ जुलै पौर्णिमा पर्यंत दिंडीचा पंढरपुर  येथे मुक्काम.  ३/७/२०२३   -  गोपाळ काला व परतीचा प्रवास      

शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Image
  शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे  मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. आताच याबाबत सरकारी कर्मचारी संघ सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्टोक्ती दिली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर म्हणाले...  "मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. संपाचा जो परिणाम झाला. त्यातून शासन दरबारी पडसाद पडले. त्यातून आमची शासनासोबत आज बैठक झाली त्यात जी चर्चा झाली ती यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती", असं श्री. काटकर म्हणाले.  "शासनाने यासंदर्भात गेल्या 7 दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की, राज्य सरकार याबाबत गंभीर विचार करत आहे. यासंदर्भात सरकारनं एक समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यान

मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

Image
आताच मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या यशस्वी चर्चेनुसार सदर चर्चेमध्ये तोडगा निघाल्याची बातमी आहे. परंतु नेमका तोडगा काय निघाला आहे  हे अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. 

खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय?

Image
खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय?  अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील  महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. पण ही सवलत काय आहे सविस्तर जाणून घेऊया. अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. आणि अखेर १७ मार्चपासून सवलत देण्याचा  महाराष्ट्र सरकारकडून जी आर काढण्यात आला. यापुढे महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत मिळाली आहे, मात्र प्रवासासाठी आरक्षण  करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना एकच  असणार? सवलतीत  असलेली बस कशी ओळखायची ? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बसला ? ह्या  सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया....  महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे. सवलतीचे नियम व अटी जाणून घेऊया :-  महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये यापुढे ५०

शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे

Image
https://twitter.com/abpmajhatv/status/1626581152403423234?t=T-ApFNxczJZm4bL5o62Daw&s=35  शिवसेना व धनुष्यबाण  एकनाथ शिंदे  यांच्याकडे.            एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पक्षाचे नाव ‘शिवसेना’ व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाकडे याचा निर्णय दिला आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे  व त्यांच्या समर्थकांच्या पारड्यात टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. https://www.youtube.com/watch?v=cXcctrCYl2M&t=875s https://www.youtube.com/watch?v=c3q49nDlsSw एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया           वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकशाहीत बहुमताला   महत्व आहे.  आज सत्याचा विजय झाला आहे.  मी यापुढे देखील बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वव