शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे


https://twitter.com/abpmajhatv/status/1626581152403423234?t=T-ApFNxczJZm4bL5o62Daw&s=35

 शिवसेना व धनुष्यबाण  एकनाथ शिंदे  यांच्याकडे. 

          एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पक्षाचे नाव ‘शिवसेना’ व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाकडे याचा निर्णय दिला आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे  व त्यांच्या समर्थकांच्या पारड्यात टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=cXcctrCYl2M&t=875s

https://www.youtube.com/watch?v=c3q49nDlsSw

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

          वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकशाहीत बहुमताला   महत्व आहे.  आज सत्याचा विजय झाला आहे.  मी यापुढे देखील बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचारांच्या वाटेवर चालून  जनतेची सेवा करेन अशी प्रतिक्रिया  एकनाथ शिंदे  यांनी दिली आहे.

          एकीकडे शिंदे गटातील नेते या निकालावर समाधान व्यक्त करत असतानाच ठाकरे गटातील नेत्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावर जोरदार असा  आक्षेप नोंदवला आहे. उद्धव ठाकरे समर्थक संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा खोक्यांचा विजय असल्याचे म्हंटले. सुप्रिया सुळे यांनी याबाबत  वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हंटले आहे. 

Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.