राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ......

 



शिक्षण सेवकांचे मानधनात                      वाढ

          महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत २०१६ पासून शिक्षण सेवक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत होता.  या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यालयात नियुक्त झालेल्या शिक्षकांना पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात आहे.  त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित नुतन  सेवकांना नियमित शिक्षक म्हणून राज्य शासकीय सेवेत घेतले जाते. 

           सन २०११ पासून आतापर्यंत प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये,  माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये,  तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते.  हे मानधन कमी असल्याने शिक्षण सेवकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. परिणामी  शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली  जावी अशी त्यांची मागणी होती.  आता सरकारने या मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेऊन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली आहे. 

          जे नवोदित शिक्षण सेवक शासकीय सेवेत येतील त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.  राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या घोषणे  नुसार राज्यात ६७  हजार नवीन शिक्षण सेवक भरती केली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा शिक्षण सेवक म्हणून शासकीय सेवेत नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना मोठा फायदा होणार आहे. 

          मंत्रिमंडळाने दिनांक २२/१२/२०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक,  माध्यमिक,  उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

https://www.maharashtra.gov.in/1145/government-resolutions





Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.