खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय?

खुशखबर एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सूट, पण नियम अटी काय? 


अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी अधिवेशनात मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील  महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. पण ही सवलत काय आहे सविस्तर जाणून घेऊया.



अधिवेशनात महिलांसाठी मोठी घोषणा झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीची वाट सगळ्या महिला पाहत होत्या, काही ठिकाणी तर घोषणेच्या दुसऱ्याच दिवसापासून महिला तिकीट कंडक्टरशी भांडू लागल्या. आणि अखेर १७ मार्चपासून सवलत देण्याचा  महाराष्ट्र सरकारकडून जी आर काढण्यात आला. यापुढे महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत मिळाली आहे, मात्र प्रवासासाठी आरक्षण  करता येईल का? महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना एकच  असणार? सवलतीत  असलेली बस कशी ओळखायची ? एसी बसला सवलत असेल की फक्त नॉन एसी बसला ? ह्या  सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया....


 महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात आली आहे या योजनेला महिला सन्मान योजनेने संबोधित केले आहे.


सवलतीचे नियम व अटी जाणून घेऊया :- 

महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये यापुढे ५० टक्के सूट देण्यात आली आहे, आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम , विनावातानुकुलित शयन-आसनी एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिनही  साध्या आणि एसी बसमध्ये ५० टक्के सवलत १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

          दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरिताही ही सवलत लागू असणार आहे. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.


          प्रवासी भाड्यातील अपघात साहाय्यता निधी आणि एसी बससेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात येणार. 

          समजा जर  तुमचं तिकीट १० रुपये असेल तर त्यावर तु्म्हाला ५ रुपये सवलत मिळेल आणि त्यावर २ रूपये कर आकारणी असणार आहे,  म्हणजेच तुम्हाला ७ रूपयचे  तिकीट काढावे लागणार.


          या सवलतीत तुम्ही  महाराष्ट्र राज्यात कुठेही फिरू शकता, म्हणजे पुणे, मुंबई, सातारा आणि सांगली, राज्यातील ३६  जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकता, मात्र महाराष्ट्र राज्याबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा आहे तो दर द्यावा लागणार…म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेंगलोरला  जाण्यासाठी निघालात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच ही सवलत लागू असणार आहे, तिथून पुढे  तुम्हाला पूर्ण तिकीट आकारले जाईल.


          आता लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही, म्हणजे  जर तुम्ही   शिवाजीनगर बस स्टँड ते पिंपरी चिंचवड बस स्टँड एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही…


          जर  महिला रिझर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही, म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला  तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.. यात महिलांनी पुढच्या तारखांचे आगाऊ आरक्षण केले असेल तर  तुम्हाला  त्याचा परतावा मिळणार नाही.


५ ते १२ वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५० टक्के सवलत म्हणजे अर्धे तिकीटदर आकारले जाईल


७५ वर्षांवरील महिलांसाठी अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना फुकट प्रवास करता येणार. यामध्ये ६५  ते ७५ वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.