संपकरी कर्मचारी यांचा पगार नव्हे नियमित रजा कापणार

 



संपकरी कर्मचारी यांचा  पगार नव्हे नियमित रजा  कापणार


संघटनांशी  चर्चेनंतर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  आश्वासन


संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित झाली नसली तरी संप काळातील सहा दिवसांचा पगार कापला जाण्याची  टांगती तलवार  कर्मचाऱ्यांवर होती.  मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचा पगार न कापण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.
     त्यामुळे संप  कालावधीतील गैरहजेरी  अनियमित रजा धरण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या नियमित रजा  कापल्या जाणार आहेत.  याविषयीचा सुधारित शासन निर्णयही  जाहीर केला जाणार आहे.  त्यामुळे संपकरी  कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


शिष्टाई ठरली यशस्वी


अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असतानाच जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यभरातील 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 ते 20 मार्च दरम्यान संप पुकारला होता.
मात्र सरकारने मागील आठवड्यात काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या काळातील  गैरहजेरी  अनियमित रजा धरल्याने कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार होता.
याबाबत कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.  या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत वरील आश्वासन दिल्याचे समन्वय समितीचे महाराष्ट्राचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.