आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

 

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)


 मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.


 आज मंत्रिमंडळ कडून घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

1)  वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव.

2) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव.

3)  राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता.

4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ.

5) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

6)  संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ.

7)  आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार.

8)  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा;  विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश.

9)  मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

10) पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार.

11)  मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड

12)  भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण.

13)  मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये.

14)  राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र.

15)  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार.

16)  बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित.

17)  जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता.

18)  राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता.

19) बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय.

20)  दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार

21)  दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.

22)  देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता.

23)  चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट.

24)  सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ.

25)  गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता.

26)  ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ.

27) पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार.

इत्यादी..........

Comments

Popular posts from this blog

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ......