राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतरच होणार.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरनंतरच होणार. 

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय  सहकार मंत्री अतुल सावें यांनी घेतला आहे. महाराष्ट्र  राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहे. 

सध्या राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण  होवून शकते. तसेच,  राज्यातील शेतकरी वर्ग ही पावसाळा असल्याने पेरणीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वरील सर्व कारणांमुळे  सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा  मोठा निर्णय घेतला आहे . 

पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता 

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२३ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असे सरकारचे म्हणणे आहे. काढण्यात  आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच टप्प्यावर  थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर  नजर

राज्यांमध्ये एकंदरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर  नजर टाकल्यास जवळपास ८२ हजार ६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. या पैकी ४९,३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर ४२,१५७ संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून ६५१० सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत.


जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकींमध्ये सहभाग नोंदविता यावा यासाठी हा निर्णय

राज्यात ३० जूननंतर पावसाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकींमध्ये सहभाग नोंदविता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


 सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा

२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, अशा सहकारी संस्था, ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे  फक्त बाकी आहे अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्प्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. यामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


महाराष्ट्र शासन दिनांक २८ जून २०२३ रोजी चा आदेश






Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.