पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत

 पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत




पॅनकार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१  मार्च २०२३ आहे. या दरम्यान पॅनकार्ड आधार कार्डशी  लिंक नाही केल्यास पॅनकार्ड 'नॉन ऑपरेटीव्ह' होणार असून पॅनसंबंधित सर्व आर्थिक व्यवहार अडचणीत येणार  आहेत. चालू वर्षाचे  आयकर रिटर्न भरायला जुलै अखेरपर्यत मुभा देण्यात आली आहे.

तर सन २०-२१ चे रिटर्न याच महिन्यात भरणे आयकर विभागाने बंधनकारक केले आहे.



पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकींगची मूदत ३१ मार्च

मार्च एंडिंग म्हटले की  सर्वांना आयटी रिटर्न भरण्याचे  वेध लागतात. यावर्षी मार्च एंडींगला मात्र नव्या बदलामुळे केवळ मागील काळातील रिटर्न अधिक कर देयक रकमेसह फाईल करुन घ्यायचे आहेत, जे की ITR (U) मध्ये जाईल. ज्यात आपल्याला नवीन काही वजावट व त्या काळातील रिफंड मागता येणार नाही. तर १००० रूपये लेट फी सह पॅन कार्ड व आधार कार्ड लिंकींगची मूदत ३१ मार्चला संपत असल्याने त्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

आयकर रिटर्न भरण्याच्या बाबतीत मागील वर्षापासून नवे बदल झाले आहेत. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात म्हणजे वर्ष २०२१-२२ चे आयटी रिटर्न मार्च अखेर पर्यंत भरू शकत होतो ते डिसेंबर अखेर पर्यंत करण्यात आले आणि त्यानंतर त्या वर्षाचे फक्तं अद्यायावत आयकर रिटर्न हे फाईल करता येईल. आता या महिना अखेरीपर्यंत वर्ष २०२०-२१ चे रिटर्न अपडेट करुन घेऊ शकता यानंतर त्यात काही मुभा मिळू शकणार नाही.
या शिवाय याच महिन्यात आधार व पॅन कार्ड लिंक करण्याची   मूदत ३१ मार्च २०२३  अखेरपर्यंत संपणार आहे. तसेच त्यासाठी एक हजार रुपये दंड देखील भरावा लागणार आहे.  या महिना अखेरपर्यंत पॅन कार्ड व आधार कार्ड  लिंकेज केले नाही, तर संबंधितांचे पॅन कार्ड हे नॉन ऑपरेटीव्ह होणार आहे. त्यामुळे पॅनशी जोडलेले सर्व व्यवहार अडचणीत येणार आहेत.

मार्च २०२३  अखेर पर्यंत वर्ष २०२०-२१ चे आयकर रिटर्न अपडेट करुन घेणे आवश्यक आहेत. तसेच पॅन व आधारकार्डाचे लिंक देखील ३१ मार्च  २०२३ पुर्वी करुन घ्यावे लागणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.