अधुरी भेट

 


   अधुरी भेट

आठवते का तुला गोष्ट त्या रात्रीची
ती रात्र होती धुंद पावसाची 🌨️,  सैरवैर वा-याची🌪️
स्मरते मला अजूनही अधुरी भेट त्या  रात्रीची...

निर्जन स्थळी🌳,   गुप्प  अंधारी 🌌
झाडांच्या साक्षी🌲,  चांदण्या रात्री✨
सळसळणाऱ्या पानांच्या साक्षी
आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची...

गांगरून पाहत होतो मी इकडे - तिकडे
तू मात्र निर्भीडपणे बोलत होतीस
भीती न  पर्वा होती  तुला जगाची
प्रेमासाठी तयार होतीस परीक्षा द्यायला विषाची...

मोहमयी जगाची, आपल्या माणसांची
प्रेमासाठी झुगारणी केली  होतीस सर्व नात्यांची
प्रेमासाठी सोडून दिली होतीस घर 🏠ही
त्यावेळी तुला जाणीव नव्हती तुझ्या साहसाची
आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची...

ओला चिंब झाला होता देह तुझा☄️
ओठांवर तुझ्या काही थेंब 💧विसावले होते
श्वासांमध्ये श्वास मिसळले होते आपले
आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची...

एकमेकांनी घेतल्या होत्या 👫 प्रेमाच्या  आणा भाका
ते सर्व स्वप्न होते की भास
आठवते का तुला अधुरी  भेट त्या रात्रीची
अजूनही  आहे त्या भेटीच्या पूर्णत्वाची आस...


Comments

Popular posts from this blog