राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरनंतरच होणार. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार मंत्री अतुल सावें यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबर नंतर होणार आहे. सध्या राज्यात ८२,६३१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणे कठीण होवून शकते. तसेच, राज्यातील शेतकरी वर्ग ही पावसाळा असल्याने पेरणीच्या कामात व्यस्त असतात त्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील सर्व कारणांमुळे सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे . पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२३ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे निवडणुका घेणे अशक्य असल्याने लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता असे सरकारचे म्हणणे आहे. काढण्यात आलेल्या आदेशानुसार निवड...