राज नाम तो सुना ही होगा
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या प्रतिमेमधून बाहेर पडणं आवश्यक होतं. आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली आणि त्याने या संधीचं अक्षरश: सोनं केलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा असा चित्रपट आहे ज्याने इतिहास घडवला. राज आणि सिमरनची प्रेमकहाणी, परदेशातील लोकेशन्स आणि पंजाबी तडका मारल्यामुळे ही रेसिपी एकदम भन्नाट जमून आली. या चित्रपटातील “जा सिमरन जा…जिले अपनी जिंदगी” हा डायलॉग तर आजही तितकाच लोकप्रिय आहे. १९९५ साली आलेला हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. शाहरुख – काजोल ही सुपरहिट जोडी, जतीन – ललित यांचं संगीत आणि युरोपमधली लोकेशन्स. अशी सगळी भट्टी उत्कृष्टरित्या जमू...