राज नाम तो सुना ही होगा

 

          दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या प्रतिमेमधून बाहेर पडणं आवश्यक होतं.  आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली आणि त्याने या संधीचं अक्षरश: सोनं केलं.
          दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा असा चित्रपट आहे ज्याने इतिहास घडवला. राज आणि सिमरनची  प्रेमकहाणी, परदेशातील लोकेशन्स आणि पंजाबी तडका मारल्यामुळे ही रेसिपी एकदम भन्नाट जमून आली. या चित्रपटातील “जा सिमरन जा…जिले अपनी जिंदगी” हा डायलॉग तर आजही तितकाच लोकप्रिय आहे. 
          १९९५ साली आलेला हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. शाहरुख – काजोल ही सुपरहिट जोडी, जतीन – ललित यांचं संगीत आणि युरोपमधली लोकेशन्स.  अशी सगळी भट्टी उत्कृष्टरित्या जमून आल्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लोकांना आवडला नसता, तर नवलच  होतं. 

            हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेला चित्रपट आहे. त्या वर्षीच्या म्हणजेच ४१ व्या फिल्मफेअरची बहुतांश अवॉर्ड्स ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला मिळाली होती. दुर्दैवाने या म्युझिकल हिटला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं अवॉर्ड मिळालं काही. कारण ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला तगडी स्पर्धा होती ती ‘रंगीला’ या चित्रपटाची. त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं अवॉर्ड रंगीला या चित्रपटासाठी ए.आर. रहमान यांना मिळालं होतं. 

         शाहरुख नाही तर  आमिर होती पहिली पसंती 
          हो! राज या व्यक्तिरेखेसाठी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी आधी आमिर खानची निवड केली होती. परंतु,  आमिरने या भूमिकेला नकार दिल्याने ही भूमिका शाहरुखला मिळाली. डर आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ यामधील भूमिकांना दिलेला नकार ही आमिरच्या कारकिर्दीतली सर्वात मोठी चूक समजली जाते. या दोन्ही चित्रपटांनी शाहरुखला स्टारडम मिळवून दिलं. 

         शाहरुख ऐवजी राजच्या भूमिकेत सैफ अली खान दिसू शकला असता 
          आमिर खान नंतर शाहरुख खानलाही चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे त्याने नकार दिला होता. परंतु, दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शाहरुखला विनंती केली आणि अखेर त्याने होकार दिला. जर शाहरुख तयार झाला नसता, तर दिग्दर्शकांची तिसरी पसंती होती सैफ अली खान. 
 
शाहरुखचे नाव आणि लेदर जॅकेट 
या चित्रपटातील शाहरुखचे नाव ‘राज’ हे शोमन राज कपूरच्या नावावरून घेतले होते. तर, या चित्रपटात शाहरुख खानने परिधान केलेलं लेदर जॅकेट उदय चोप्राने बेकर्सफील्डमधील हार्ले-डेव्हिडसन स्टोअरमधून $400 ला खरेदी केले होते.


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.