सांगा मी कशी जगू

 

उदरा मध्ये असताना
श्वास माझे कोंडत असते
या जगात प्रवेश करताच
घरच्यांना मी नको असते
सांगा मी कशी जगू ???????

सर्वांना वंशाचा दिवा लागतो
जसे वंशचा दिवा लावतो
सर्वांना वंशाचा दिवा हवा असतो
सांगा मी कशी जगू ???????

मिळतो सर्वत्र वंशाच्या दिव्याला मान
माझा मात्र होतो सर्व ठिकाणी अपमान
सर्वत्र केला जातो माझा धिक्कार
सांगा मी कशी जगू ???????

जन्मल्यापासूनच परक्यासारखे वाढवले जाते
मोठी झाल्यावर परक्याच्या घरी दिली जाते
तिथेही  मिळते परक्या सारखी  वागणूक
सांगा मी कशी जगू ???????

माझ्यावर किती हा परक्याचा भार
निरागस मी,  निष्पाप मी
किती दिवस सोसणार हा भार
सांगा मी कशी जगू ???????

सर्वांनाच हवा असतो वंशाचा दिवा
त्यापाई आजपर्यंत किती जणांचा जीव घेतला आठवा
आणखी किती दिवस हे चालणार
जन्मण्या  अगोदरच किती कळी  मारणार
हे जर असेच  चालत असणार
तर सांगा मी कशी जगू ???????


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.