केंद्राने १३ नवीन राज्यपालांची केली नियुक्ती. रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

 

          केंद्र सरकारने रविवारी वेगवेगळ्या राज्यात 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व लडाखचे नायब  राज्यपाल आर. के.  माथूर  यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. झारखंड येथील राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


 केंद्राने नियुक्त केलेल्या १३  नवीन राज्यपालांची नावे  खालील प्रमाणे :- 


१. . लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

२. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम

३. सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड

४. शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

५. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

६. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

७. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ

८. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर

९. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

१०. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

११. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

१२. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

१३. निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख



Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.