महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

   महत्त्वाची बातमी ! यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज



     यावर्षी देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची महत्त्वाची  माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.


      यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये  देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने  दिली आहे. यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये  देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे असा अंदाज  भारतीय हवामानशास्त्र विभागाने  
वर्तविला  आहे. 

     आज  मान्सूनचा पहिला अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने  जाहीर केला आहे. यंदा देशात ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे. 

     देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ढोबळ मानाने ९६  ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं. देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
      दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची तीव्र  प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी भारतीय हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.  

पावसाचे प्रमाण कसे ठरवले जाते ?

सन २०२३ मध्ये  सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. 

त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. 

दुसऱ्या श्रेणीत ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, 

 तिसऱ्या श्रेणीत ९६  ते १०४ टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. 

पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५  ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

 यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.



सध्याच्या वातावरणाच्या  स्थितीच्या आधारावर अंदाज

सध्या वर्तवण्यात आलेला दीर्घकालीन अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या वातावरणातील स्थितीच्या आधारावर देण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अलीकडच्या काळात अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारुपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरुन त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात


Comments

Popular posts from this blog

आजचे मंत्रीमंडळ निर्णय (२८ जून २०२३)

पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याबाबत मान्यता, व त्याकरिता ३६ पदांना मान्यता.