Posts

राज नाम तो सुना ही होगा

            दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या प्रतिमेमधून बाहेर पडणं आवश्यक होतं.  आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली आणि त्याने या संधीचं अक्षरश: सोनं केलं.           दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा असा चित्रपट आहे ज्याने इतिहास घडवला. राज आणि सिमरनची  प्रेमकहाणी, परदेशातील लोकेशन्स आणि पंजाबी तडका मारल्यामुळे ही रेसिपी एकदम भन्नाट जमून आली. या चित्रपटातील “जा सिमरन जा…जिले अपनी जिंदगी” हा डायलॉग तर आजही तितकाच लोकप्रिय आहे.            १९९५ साली आलेला हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. शाहरुख – काजोल ही सुपरहिट जोडी, जतीन – ललित यांचं संगीत आणि युरोपमधली लोकेशन्स.  अशी सगळी भट्टी उत्कृष्टरित्या जमून आल्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लोकांना आवडला नसता, तर नवलच  होतं.              हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेला चित्रपट आ

सांगा मी कशी जगू

  उदरा मध्ये असताना श्वास माझे कोंडत असते या जगात प्रवेश करताच घरच्यांना मी नको असते सांगा मी कशी जगू ??????? सर्वांना वंशाचा दिवा लागतो जसे वंशचा दिवा लावतो सर्वांना वंशाचा दिवा हवा असतो सांगा मी कशी जगू ??????? मिळतो सर्वत्र वंशाच्या दिव्याला मान माझा मात्र होतो सर्व ठिकाणी अपमान सर्वत्र केला जातो माझा धिक्कार सांगा मी कशी जगू ??????? जन्मल्यापासूनच परक्यासारखे वाढवले जाते मोठी झाल्यावर परक्याच्या घरी दिली जाते तिथेही  मिळते परक्या सारखी  वागणूक सांगा मी कशी जगू ??????? माझ्यावर किती हा परक्याचा भार निरागस मी,  निष्पाप मी किती दिवस सोसणार हा भार सांगा मी कशी जगू ??????? सर्वांनाच हवा असतो वंशाचा दिवा त्यापाई आजपर्यंत किती जणांचा जीव घेतला आठवा आणखी किती दिवस हे चालणार जन्मण्या  अगोदरच किती कळी  मारणार हे जर असेच  चालत असणार तर सांगा मी कशी जगू ???????

रक्कम बचतीचे नियोजन

Image
            आर्थिक नियोजन           मित्रांनो आपण शैक्षणिक साक्षर होतो परंतु आर्थिक साक्षर होत नाही. गणिताची आकडेमोड येणे म्हणजे आर्थिक साक्षरता नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे बचतीची सवय. पालकांनी आर्थिक साक्षर होऊन आपल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनी मधून बचतीची सवय लावणे हि आर्थिक नियोजनाची पहिली पायरी. उधळपट्टी आणि आर्थिक नियोजन यांचा छत्तीस चा आकडा आहे. विद्यार्थी दशेतच  जर आर्थिक नियोजनाचे धडे मिळाले तर  आपल्याला संपूर्ण आयुष्य सुख आणि समाधानाने जगता येईल.बचती बरोबर पहिली कमाई सुयोग्य रित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्वीतां सुरु होते.आर्थिक नियोजनाचे महत्व आपणांस जर आता समजले असेल तर  आपले वय कितीही असुदे या क्षणा पासून सुरुवात करा.              बचतीचे गणित समजून घ्या           कमाई आहे पण बचत होत नाही. महिन्याकाठी पैसे शिल्लकच राहत नाहीत. अधिकाधिक नोकरी करणाऱ्यांची हीच समस्या असते. मग स्वत:ला दिलासा देण्यासाठी म्हणतात, जेव्हा पगार  वाढेल तेव्हा काही पैसे बचत करू. पण असे कधीच होत नाही. जेणेकरून भविष्यात तुम्हाला पैसे कामाला येतील. तुमचीही

माझ्या ब्लॉग बद्दल थोडसं

Image
सविनय सादर,       सदरचा ब्लॉग मी कथा, कविता लिहिण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. मला रहस्य कथा वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. मी यापूर्वीही कित्येक रहस्य कथा लिहिल्या आहेत व प्रकाशित ही  केलेल्या आहेत.       सदर ब्लॉगद्वारे मी माझ्या प्रिय वाचकांसमोर उत्तमोत्तम कथा, कविता व प्रत्येक क्षेत्रातील उपयुक्त अशी माहिती सादर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.       धन्यवाद 🙏 🙏