Posts

Good morning images

Image
 Good morning images

शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे

Image
https://twitter.com/abpmajhatv/status/1626581152403423234?t=T-ApFNxczJZm4bL5o62Daw&s=35  शिवसेना व धनुष्यबाण  एकनाथ शिंदे  यांच्याकडे.            एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवाव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांना आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पक्षाचे नाव ‘शिवसेना’ व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाकडे याचा निर्णय दिला आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण एकनाथ शिंदे  व त्यांच्या समर्थकांच्या पारड्यात टाकले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. https://www.youtube.com/watch?v=cXcctrCYl2M&t=875s https://www.youtube.com/watch?v=c3q49nDlsSw एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया           वृत्तपत्र माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकशाहीत बहुमताला   महत्व आहे.  आज सत्याचा विजय झाला आहे.  मी यापुढे देखील बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वव

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ......

Image
  शिक्षण सेवकांचे मानधनात                      वाढ           महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत २०१६ पासून शिक्षण सेवक नियुक्तीचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येत होता.  या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक,  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यालयात नियुक्त झालेल्या शिक्षकांना पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात आहे.  त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित नुतन  सेवकांना नियमित शिक्षक म्हणून राज्य शासकीय सेवेत घेतले जाते.             सन २०११ पासून आतापर्यंत प्राथमिक शिक्षण सेवकांना सहा हजार रुपये,  माध्यमिक शिक्षण सेवकांना आठ हजार रुपये,  तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते.  हे मानधन कमी असल्याने शिक्षण सेवकांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. परिणामी  शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली  जावी अशी त्यांची मागणी होती.  आता सरकारने या मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेऊन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केली आहे.            जे नवोदित शिक्षण सेवक शासकीय सेवेत येतील त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.  राज्य शासनाने नुकत्या

Good morning

Image

💐शुभ सकाळ 💐

Image
 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

Image
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर  बक्षीस समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणारा जीआर काढला.  थकबाकी मिळणार नाही फेब्रुवारीपासून लाभ            राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतन त्रुटीतील त्रुटी दूर करीत त्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबतचा शासन निर्णय दि. १३/०२/२०२३ रोजी  काढण्यात आला.  १०५  संवर्गांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.            कर्मचाऱ्यांच्या पाचव्या,  सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव के. पी.  बक्षी यांनी राज्य सरकारला २०२१ मध्ये अंतिम अहवाल दिला होता.  त्या आधारे हा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला आहे. बक्षी  समितीने २०१८ मध्ये पहिला अहवाल दिला.  मात्र तत्कालीन मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अधिकचे  अभ्यास करण्याची  शिफारस करत हा अहवाल परत केला होता.   त्यानंतर समितीने  ८ फेब्रुवारी २०२१ रोजी  अंतिम अहवाल सादर केला. 

केंद्राने १३ नवीन राज्यपालांची केली नियुक्ती. रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

            केंद्र सरकारने रविवारी वेगवेगळ्या राज्यात 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व लडाखचे नायब  राज्यपाल आर. के.  माथूर  यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. झारखंड येथील राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   केंद्राने नियुक्त केलेल्या १३  नवीन राज्यपालांची नावे  खालील प्रमाणे :-  १. . लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश २. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम ३. सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड ४. शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश ५. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम ६. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश ७. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ ८. अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर ९. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड १०. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय ११. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार १२. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र १३. निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

जखम भाग - १

Image
           इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना अतिशय दगदगीचा काळ सुरू झाला होता.  त्यांच्या एम.आय.डी.सी.  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक अशांतता पसरली होती. त्यामुळे ते अतिशय चिंताग्रस्त होते.  चालू असणारी औद्योगिक अशांतता कशाप्रकारे लवकरात लवकर मिटविता येईल  हे ते पाहत होते.  अशा अशांततेच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारे घातपात,  मारामारी किंवा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होऊ नये म्हणून ते अतिशय काळजी घेत होते.  त्यांनी फौजदार भोसले, जमादार शिंदे व इतर पोलिसांना त्या विभागात कडक  निगराणी ठेवण्यास सांगितले होते. इन्स्पेक्टर विजयकुमार सक्सेना यांना सुद्धा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्या विभागात दक्षता घेण्याचे आदेश आले होते.             इतर फॅक्टरी पेक्षा सोलापूर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीची परिस्थिती अतिशय चिंताजनक होती.  त्या फॅक्टरीत जवळजवळ दोन हजार कामगार वर्ग कामाला होते.  कामगार व मालक यांच्या मध्ये  पगार, सुट्टी व बोनस या कारणाने वातावरण तापले होते. त्या फॅक्टरीचा कामगार युनियन लीडर किरण चौरे व फॅक्टरीचे मालक लालसिंग बलदवा यांच्यामध्ये रोज कामगारांचे पगार,  सु

राज नाम तो सुना ही होगा

            दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने शाहरुखला खऱ्या अर्थाने ‘रोमँटिक हिरो’ ही ओळख मिळवून दिली. त्यावेळी त्याला बाजीगर, डर, अंजाम, कभी हा कभी ना अशा चित्रपटातील नकारात्मक आणि एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्हिलनच्या प्रतिमेमधून बाहेर पडणं आवश्यक होतं.  आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील राजच्या भूमिकेने त्याला ही संधी दिली आणि त्याने या संधीचं अक्षरश: सोनं केलं.           दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा असा चित्रपट आहे ज्याने इतिहास घडवला. राज आणि सिमरनची  प्रेमकहाणी, परदेशातील लोकेशन्स आणि पंजाबी तडका मारल्यामुळे ही रेसिपी एकदम भन्नाट जमून आली. या चित्रपटातील “जा सिमरन जा…जिले अपनी जिंदगी” हा डायलॉग तर आजही तितकाच लोकप्रिय आहे.            १९९५ साली आलेला हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट आहे. शाहरुख – काजोल ही सुपरहिट जोडी, जतीन – ललित यांचं संगीत आणि युरोपमधली लोकेशन्स.  अशी सगळी भट्टी उत्कृष्टरित्या जमून आल्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लोकांना आवडला नसता, तर नवलच  होतं.              हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात जास्त काळ थिएटरमध्ये राहिलेला चित्रपट आ